राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना(National Means Cum-Merit Scholarship, NMMS) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २००७-०८ पासून एनएमएमएस या परीक्षेचे आयोजन केले आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते.या परीक्षेअंतर्गत बुद्धिमान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यता मिळते.

NMMS ही परीक्षा भारत केंद्र सरकार द्वारे सुरू केली आहे.ही परीक्षा देशातील संपूर्ण राज्यात घेतली जाते.या केंद्रीय शिष्यवृत्ती मध्ये महाराष्ट्रासाठी 11682 एवढा कोटा आहे. या  योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना महिन्याचे एक हजार रुपये म्हणजेच वर्षाचे बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती सलग चार वर्षे ,म्हणजेच 48 हजार रुपये मिळते. महाराष्ट्र सरकारने अपंगांसाठी 4% कोटा आरक्षित ठेवला आहे.एनएमएमएस ही परीक्षा इयत्ता आठवीच्या अखेर घेण्यात येते.आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार या परीक्षेची तारीख निश्चित केली जाते.ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत आहे ,अशाच विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर या योजनेचा लाभ मिळू शकतो. 

NMMS 2022 इयत्ता आठवी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा योजना

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

लाभार्थ्यांची आवश्यक पात्रता

 • लाभार्थ्याला किमान सातवी मध्ये 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 • वडीलाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे.
 • विद्यार्थी हा सैनिकी शाळेमध्ये शिकणारा , जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय तसेच वस्तीग्रह किंवा शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारा नसावा. .
योजनेचे नाव :एनएमएमएस शिष्यवृत्ती योजना
योजनेचे लाभार्थी: NMMS परीक्षा उत्तीर्ण 
ही योजना केव्हा सुरू केली :2007-2008
योजनेचे उद्दिष्ट:आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन 
वेबसाईट :www.mscepune.in

NMMS परीक्षेचे स्वरूप: 

 • या परीक्षेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने किंवा शाळेमध्ये भरता येऊ शकतो. 
 • राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते.
 • या परीक्षेसाठी दोन विषयाचे पेपर घेतले जातात.
 • बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) व शालेय क्षमता चाचणी (SAT).
 • या विषयाचा प्रत्येक पेपर 90 मार्कासाठी दिला जातो.
 • सर्वसामान्यांसाठी 40 % गुण तर आरक्षित प्रवर्गासाठी 32 % गुण असणे आवश्यक आहे.
 • त्यामध्ये SC व ST प्रवर्गासाठी 5% सूट आहे.
 • ही परीक्षा हिंदी, इंग्रजी ,मराठी ,गुजराती, उर्दू, तेलगू किंवा कन्नडी अशा कोणत्याही प्रकारच्या भाषेतून देता येते .

एनएमएमएस योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे:

 • आधार कार्ड 
 • बँक पासबुक 
 • दोन पासपोर्ट साईज फोटो 
 • सातवी उत्तीर्ण गुणपत्रक 
 • उत्पन्नाचा दाखला 
 • आरक्षित असेल तर कास्ट सर्टिफिकेट  

अशाप्रकारे आपण योग्य माहिती भरून आपला NMMS परीक्षा फॉर्म ऑनलाइन किंवा शाळेमार्फत भरू शकता. नंतर परीक्षा निकालाच्या तारखा जाहीर केल्या जातात. या योजनेसाठी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर मुख्याध्यापक माहिती देतात.www.mscepune.inया संकेत स्थळावर  जिल्हानिहाय शिष्यवृत्ती कोठा जाहीर केला जातो. त्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. 

Also Read: Mahabhulekh, 7/12, 8A How to View Online bhulekh.mahabhumi.gov.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top