Rajshree Shahu Maharaj Scholarship Application:-
आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, यादृष्टीने राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येते .
महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली . या योजनेचा लाभ 11वी व 12 वी साठी मिळतो .या योजनेचा फॉर्म mahadbt Mahait Gov. in या वेबसाईटवर ऑनलाइन किंवा कॉलेज मार्फत भरता येऊ शकतो . या योजनेचा लाभ आपण दोन वर्षापर्यंत घेऊ शकतो.या योजने मार्फत विद्यार्थ्याला प्रतिमहा तीनशे रुपये प्रमाणे दहा महिन्यासाठी दिले जातात. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याला वयाची बंधन कारक अशी कोणतीही अट नाही.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी आर्थिक दृष्ट्या शिक्षणापासून वंचित राहू नये, व त्यांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
लाभार्थ्यांची आवश्यक पात्रता:
- विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा असावा.
- विद्यार्थी हा 11वी किंवा 12वी मध्ये शिकणारा असावा.
- विद्यार्थ्याला दहावीमध्ये 75% पेक्षा जास्त गुण असावे.
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाखापेक्षा अधिक नसावे.
योजनेचे नाव : | राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना (scholarship) |
योजनेचे लाभार्थी: | दहावी परीक्षा उत्तीर्ण |
योजनेचे उद्दिष्ट: | आर्थिक दृष्ट्या शिक्षणापासून वंचित राहू नये |
वेबसाईट : | mahadbt Mahait Gov. in |
Shahu Maharaj Scholarship साठी लागणारी कागदपत्रे:
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला.
- दहावी उत्तीर्ण मार्कशीट
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- SSC पास टी.सी.
- बँक खाते पासबुक
राजश्री शाहू महाराज योजनेचा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा?
- सर्वप्रथम आपण mahadbt Mahait Gov. in वेब पेज ओपन करावा.
- वेब पेज ओपन झाल्यावर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे .
- नंतर त्या ओपन पेज वरती तुमची योग्य व अचूक माहिती भरा.
- जसे अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी.
- आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.तोओटीपी व्हेरिफिकेशन करा .
- त्यानंतर युजर आयडी भरा.
- नंतर पासवर्ड टाका.
- शेवटी Save बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा. अशाप्रकारे तुमचा राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती ( Shahu Maharaj Scholarship ) फॉर्म भरला जाईल
Read Also: NMMS 2022: इयत्ता आठवी आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा योजना